सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या तुटून गेलेल्या उसाला टनाला ३१०० रुपये दर जाहीर केला आहे. यधील २८०८ रुपये गेल्याच वर्षी दिली असून उर्वरित २९२ रुपयांपैकी २०० रुपये ठेव कपात केली जाणार असून टनाला रोख ९२ रुपये तसेच ठेवींवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा होणार आहे.
त्याच बरोबर सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला २ कोटी ८२ लाख देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. तर शेयर्सची रक्कम १० हजारावरून १५ हजार करण्यात येणार असून वरील ५ हजार रक्कम ही दोन टप्प्यात कपात केली जाणार आहे. तसेच डिस्टलरी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत ३० हजारांची डिस्टलरी ६० हजार करण्यापेक्षा १ लाख लिटर प्रतिदिन करावी अशी मागणी सभासदांनी केली.