सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निंबुत (निरा) येथील ज्युबिलंट इंग्रेव्हिया लिमिटेड या कंपनीच्या कामगारांना बोनस इन्सेन्टिव्ह दिवाळी ऍडव्हान्स असे सर्व मिळून रुपये प्रत्येक कामगाराला ४६ हजार रुपये कामगारांच्या खात्यावर चार दिवसापूर्वीच जमा केलेत अशी माहिती ज्युबिलट कामगार युनियनचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्यामुळे सर्व कामगारांमध्ये आनंदाचे व उत्सहाचे वातावरण आहे यावेळी युनियनचे उपाध्यक्ष सुरेश कोरडे जनरल सेक्रेटरी सुनीलदत्त देशमुख, खजिनदार, नंदकुमार निगडे तसेच सदस्य जनार्दन काकडे, अशोक पोकळे, ज्योतीराम कदम व सुभाष खलाटे उपस्थित होते.
दिवाळुपूर्वी २० दिवस आगोदर सर्व रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा केल्याबद्दल कामगार युनियनचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी स्थानिक व्यवस्थापन व वरिष्ठ व्यवस्थापन कार्पोरेट या दोघांचे आभार मानले तसेच संघटनेतर्फे अभिनंदन केले. तसेच अध्यक्षांनी सर्व कामगार अधिकारी वर्ग व कंत्राटी कामगार याना येणाऱ्या दिवाळीच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS