सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-वेल्हा-मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या मागील ३ पंचवार्षिकमधील विकास कामांचा धडाका पाहून तसेच कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन मळे-भुतोंडे खो-यातील मौजे खुलशी ता.भोर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील २१ कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची मळे-भुतोंडे खोऱ्यात पकड मजबूत होणार असल्याचे चित्र आहे. पक्ष प्रवेश अरुण पिलाणे,विलास पिलाणे, विश्वास पिलाणे,प्रकाश रेणूशे,विश्वास नामदेव पिलाणे,शंकर पिलाणे,तानाजी पिलाणे, भरत पिलाणे, भिमाजी पिलाणे, दत्ता पिलाणे,अशोक पिलाणे, समिर पिलाणे,रविद्र गोगावले,श्रीराम पिलाणे,गणेश पिलाणे, हनुमंत पिलाणे, संजय पिलाणे,चंदर पिलाणे, विजय गोहीणे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात केला असून आमदार थोपटे यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.यावेळ भोर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष माऊली नलावडे, खरेदी विक्री संघाचे संचालक वसंत वरखडे उपस्थित होते.
COMMENTS