सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्यांना अंतिम भावातील उर्वरित ९२ रुपये, ठेवींवरील व्याज तसेच कामगारांना दिवाळीनिमित्त ऍडव्हान्स १६ टक्के बोनस व रोजंदारीत काम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये येत्या चार दिवसात खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षी तुटुन गेलेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये अंतिम दर दिला आहे. यापूर्वीच सोमेश्वर ने टनाला २८०८ रुपये एफआरपी अदा केली आहे. उर्वरित २९२ रुपयांमधील टनाला २०० रुपये परतीची ठेव वजा जाता टनाला ९२ रुपये तसेच ठेवीवरील व्याजाची रक्कम तसेच दिवाळीनिमित्त कामगारांना १६ टक्के बोनस व रोजंदारीत काम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये देण्याचा निर्णय काल संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. ही रक्कम येत्या चार दिवसात खात्यावर वर्ग करणार असल्याची माहीत जगताप यांनी दिली.