सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
परिंचे (ता. पुरंदर ) येथे एका विवाहित महिलेला माहेर वरुन दुचाकी खरेदी करण्यासाठी पैसे आणण्यासाठी पती व सासू यांनी तगादा लावला होता. परंतु फिर्यादी महिलेने पैसे न आणल्यामुळे तिला लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले आहे. यासंदर्भात आरोपी पती प्रकाश शकंर कुचेकर, सासु पार्वती शंकर कुचेकर (रा.परिंचे ता.पुरंदर जि.पुणे) यांच्या विरोधात फिर्यादी पत्नीनीने सासवड पोलस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सण २०१६ साला पासून ते ०२/१०/२०२१ रोजी रात्री ०९:०० दरम्यान मौजै परिंचे ता. पुरंदर जि. पुणे गावचे हद्दीत राहते घरी यातील आरोपी यांनी फिर्यादीस मोटरसायकल घेण्यासाठी माहेर वरुन एक लाख रुपये आण असे म्हणून पैसे न दिल्याच्या व सात वर्षे लग्न होवून देखील मूल झाले नाही म्हणून फिर्यादी यांचे चारित्र्यावर संशय घेऊन तू आमच्या घरी राहावयाचे नाही, तुला आम्हाला नादंवायचे नाही असे म्हणून आमच्या घरी राहायचे नाही. तू इथे राहू नको तू तुझ्या माहेरी जाऊन रहा असे बोलून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला माझे पती यांनी दारू पिवून येवून आमच्या घरी राहायचे नाही, तू घराचे बाहेर जा तू येथे राहू नको असे म्हणून लोंखडी सळईने माझे दोन्ही पायाचे मांडीवर ,उजवे पायाचे पोटरीवर मारहाण करून आपखुशीने दुखापत केली आहे. माझे सासूने मला हाताने मारहाण करून शिवीगाऴ व दमदाटी केली आहे. म्हणुन माझे पती प्रकाश शकंर कुचेकर, सासु पार्वती शंकर कुचेकर रा.परिंचे ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपासपुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.