खंडाला ! लोणंद येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध : आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद प्रतिनिधी 

लोणंद येथे पत्रकार प्रशांत ढावरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध खंडाळा तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात येऊन हल्लेखोरास तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. 

आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे खंडाळा तालुका अध्यक्ष गणेश भंडलकर, उपाध्यक्ष मंगेश माने सचिव बिल्कीस शेख यांच्यासह पत्रकार शशिकांत जाधव , ज्ञानेश्वर ससाणे, अक्षय दोशी, विजय शेळके , आबासो धायगुडे, राहिद सय्यद आदी पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत हल्लेखोर संदिप खरात या व्यक्तीला अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के वायकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. 
       सदर संतापजनक घटनेचा सातारा जिल्ह्य़ातील तसेच परजिल्हातील व राज्यातील पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून सदर व्यक्तिवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी विविध स्तरातून पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच अनेक सामाजिक संघटनांकडून देखील अशा अपप्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.
To Top