सोमेश्वर कारखान्याचा 'हा' नवनिर्वाचित संचालक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट पोहचतोय शेतकऱ्यांच्या बांधावर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित चेहऱ्यांना संधी देताना कामे करा अशा सूचना दिल्या त्यानुसार सोमेश्वर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक ऋषी गायकवाड यांनी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन थेट शेताचा बांध गाठला आहे. 
         सोमेश्वर सहकारी साखर कारखाण्याचा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या हंगामात सभासदांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी नवनिर्वाचित संचालक बांधावर जाऊन भेटी घेत आहेत. सोमेश्वर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक ऋषि गायकवाड यांनी चौधरवाड़ी व करंजे येथील सभासदांच्या भेटी घेऊन उसतोडणी च्या बाबतीतील अडचणी समजून घेतल्या, ज्या भागातून ऊस वाहतुकीला रस्त्याच्या अडचणी आहेत तिथे कारखान्याच्या वतीने जेसीबी मशीनद्वारे मदत केली जाईल असे त्यानी सांगितले. सभासदांचा ऊस वेळेत जाईल यासाठी आम्ही सर्व संचालक प्रयत्नशील आहोत असे आश्वासन त्यांनी उपस्थित सभासदांना दिले. या भेटी वेळी गावचे माजी सरपंच तानाजी भापकर, पोलिस पाटील राजकुमार शिंदे, भटक्या विमुक्त जातीचे बारामती तालूक्याचे उपअध्यक्ष प्रताप गायकवाड, जेष्ठ सभासद सुरेश पवार, बाळासाहेब चौधरी, प्रदीप भापकर, सुखदेव शिंदे, विक्रम पवार, करंजे ग़ावचे सभासद पिंगले, होळकर,दगडे इ. उपस्थित होते.
To Top