बारामती ! डोर्लेवाडी येथे एकरी १०० टन ऊसउत्पादनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
डोर्लेवाडी येथे बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व नेचर केअर फर्टिलायझर प्रा. लि. विटा ( सांगली) तसेच सहायक निबंधक सहा. संस्था बारामती( महाराष्ट्र शासन)  यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परिसंवाद व शिवारफेरी चे आयोजन  अनिल नवले व  प्रदीप मेंढके यांनी मेढंके फार्मवर ( शेतात) केले होते. या कार्यक्रमाचे वेळी शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
              वंसतदादा शुगर इन्टिट्यूट चे माजी शास्त्रज्ञ  सुरेश माने पाटील यांनी आधुनिक ऊस लागवडी विषयी मार्गदर्शन करताना जमिनीतील सेंद्रीय कर्ब कसा वाढवावा भारीजमीनी मध्ये सबसॉईलर चा वापर कसा करावा एकरी ४० ते ४५ हजार ऊस संख्या ठेवण्यासाठी सरीतील व टिपरातील अंतर तांत्रिक दृष्ट्या किती ठेवावे प्रती ऊसाचे वजन  अडीच ते तीन किलो भरविण्या साठी सेंद्रीय ; रासायनिक व जैविक खताचा संतुलित वापर कसा करावा ; ठिबक सिंचन मधुन खते कशी द्यावीत; बेणे निवड; ऊस जात निवड; आंतरमशागत ; तणनियंत्रण या विषयी सखोल मार्गदर्शन केले .
कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी  प्रवीन करणे; रमेश मोरे; सोमनाथ नवले; बाळासो नवले; शत्रुघ्न बुरुंगले; जयेद्र जाचक; डॉ. मोकाशी ; नारायण बनकर; अरविंद नाळे; आंनदराव सांळुखे; रमेश मेंढके; धनजंय कालगावकर ; किसनराव जाधव; आप्पा ढवाण; गणेश वाघ उपस्थित होते. 
नेचर केअर प्रतिनिधी श्री सुनिल टाकळकर; बारामती संघ प्रतिनिधी सोमनाथ यादव, पोपट सांवत, जितेद्र जाधव हे कार्यक्रमास उपस्थित होते.
शिवारफेरी चे आयोजन  अनिल नवले व  प्रदीप मेंढके यांच्या शेतावर केले.

To Top