सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेऊर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या चांगल्या चांगल्या कामात खडा टाकण्याचं काम विरोधकांकडून केले जात आहे. विरोधाला विरोध म्हणून भाजपने या निवडणुकीत पॅनेल उभे केले असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
जेऊर ता पुरंदर येथे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सभासद संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी विजयराव कोलते, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, माणिकराव झेंडे, दत्ता झुरंगे, दत्ताजी चव्हाण, उत्तम धुमाळ, बबुराव माहूरकर, विश्वास जगताप, शामराव धुमाळ, अनंत तांबे, राहुल तांबे, विजय धुमाळ, बाळासाहेब कामथे, माऊली धुमाळ, सोमनाथ तांबे, चंद्रकांत पिलाने, जनार्धन तांबे, पांडुरंग ठोंबरे, प्रकाश चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, कारखान्यावरील कर्ज फेड करत गेली पाच वर्षे चांगला दर दिला आहे. ३०६० च्या आधीच्या सरासरीने सोमेश्वर ने दर दिला आहे. कारखान्याने कायम सभासदांचे सर्वांगीण हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या सभासदांना १३ हार्वेस्टर घेण्यासाठी प्रोत्साहन देत नवीन व्यवसाय निर्माण करून दिला आहे. तसेच कारखाना, विजप्रकल्प व डिस्टलरी विस्तारवाढ करत असताना दराची परंपरा कायम राहील असे आश्वासन जगताप यांनी दिले.
कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे म्हणाले, कै मुगुटराव काकडे यांनी याभागातील शेतकऱ्यांसाठी उपासा सिंचन योजना राबवल्यामुळे याभागात उसाचे क्षेत्र वाढले. २००५-०६ पर्यंत सोमेश्वर कारखान्याला बाहेरील उसावर अवलंबून राहावे लागत होते मात्र २००७ साली २६५ च्या परवानगीने सोमेश्वर कारखाना उसाबाबत स्वयंपूर्ण झाला. असे सांगून ९२ नंतरच्या कारभरानंतर कारखान्याची आर्थिक घडी बसली त्यानंतर विस्तारवाढ, डिस्टलरी, विजप्रकल्प बायोगॅस प्रकल्प उभारले. फुले २६५ ने शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवली. गेली पाच वर्षे एफआरपी पेक्षा जादा दर देण्याचे काम सोमेश्वर कारखान्याने केले असल्याचे काकडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव धुमाळ यांनी केले तर आभार तानाजी तांबे यांनी मानले.