मोठी बातमी ! घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोरगाव-हडपसर पीएमटी बससेवा सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

मोरगाव :  घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या  मुहर्तावर उद्या दि . ७  पासून हडपसर मोरगाव  पिएमटी बस सेवा सुरु केली जाणार आहे . प्रायोगिक तत्वावर बसच्या दिवसभरात पाच  फेऱ्या होणार  असून याबाबतचे परीपत्रक  पुणे महानगर परीवहन महामंडळाने काढले आहे .

मोरगाव हे अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असल्याने येथे राज्यासह परराज्यातुन भावीक मयुरेश्वर दर्शनासाठी येतात .यामध्ये पुणे व मुंबई येथून  येणाऱ्या भक्तांची संख्या  अधीक आहे . तसेच मोरगाव हे तालुक्यातील महत्वाची बाजार पेठ असल्याने येथून  पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधीक आहे . यांसारख्या अनेक उद्देशाने  मोरगाव येथून बस सेवा सुरु केली जाणार आहे .


याबाबत   ग्रामपंचायत मोरगावच्या वतीने सरपंच निलेश केदारी यांनी वेळोवेळी  पत्रव्यवहार करुन  उपमुख्यमंत्री अजीत पवार यांकडे  पाठपुरावा केला होता . तसेच   पुणे महानगर परीवहन मंडळाला चिंचवड देवस्थान ट्रस्टने  पत्रव्यवहार करुन बससेवा सुरु करण्याची मागणी केली असल्याचे विश्वस्त विनोद पवार यांनी सांगितले  . या सुरु होणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
To Top