सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामतीच्या पश्चिम भागात रविवारी सायंकाळी साडेचार ते सहा दरम्यान ढगफुटी सदृष्य पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून सोमेश्वरनगर परीसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून बाजरी व सोयाबीन पीके पाण्याखाली गेली आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे निरा- बारामती मार्ग पाण्याखाली गेला होता. तुफान पावसामुळे रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते. या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद रविवारी नोंदण्यात आली. ठिकठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. तर अनेक ठिकाणी शेतातील बांद फुटण्याचे प्रकार घडले. तब्बल दीड तास फक्त पावसाचे पाणी पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमेश्वर परीसरातील निंबुत, निंबुत छप्री, अक्षय गार्डन परीसर, वाघळवाडी, करंजेपुल , वाणेवाडी, मुरूम, करंजे, होळ, सोरटेवाडी, सोमेश्वर मंदीर परीसर आदी भागात मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी सात नंतरही पावसाची रिमझिम सुरु होती. सलग पाऊस झाल्याने शेतीसह जनावरांच्या पाण्याच्या आणि चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
COMMENTS