सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकित
राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलचे भटक्या जाती /जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार अनंत विनायक तांबे रा.जेऊर ता: पुरंदर जि पुणे यांना तीन अपत्य असल्या कारणाने त्यांना निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंध करावा अशी मागणी भटक्या जाती /जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार आदिनाथ सोरटे यांनी केली आहे.
आदिनाथ सोरटे यांनी दिलेल्या प्रशिदीपत्रकात म्हटले आहे की, सोमेश्वर कारखान्याचा २०२१ ते २०२६ कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २दोनवेळा स्थगिती केला गेला होता त्यानंतर पुन्हा स्थगिती पासून कार्यक्रम सुरू केला गेला निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी २३फेब्रुवारी २०२१रोजी पार पडली व नंतर पुन्हा स्थगिती झाली सदर छाननीमध्ये महाराष्ट्र सह संस्था अधिनियम १९६०चे कलम ७३ क अ मधील नियम ०७ अन्वये कोणत्याही व्यक्तीला तिसरे अपत्य असल्यास ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र आहे.
या निवडणुकीमध्ये भटक्या जाती /जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार अनंत विनायक तांबे रा.जेऊर ता: पुरंदर जि पुणे यांना तीन अपत्य खालीलप्रमाणे
१)श्रेयस अनंत तांबे वय वर्ष २१.
२) पायल अनंत तांबे वय वर्षे १९
३) यशराज अनंत तांबे वय वर्ष १४ जन्मदिनांक ०१/०९/२००७ सदरील व्यक्ती रेशन कार्डची छायांकित प्रत त्या अर्जासोबत जोडण्यात आली आहे. उमेदवाराकडून खोट्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून महा.सहा संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींचे उल्लंघन होत असून अनंत विनायक तांबे यांनी निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करावा व सदर होणार्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती /जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार यांना निवडून देण्यास पात्र करावे ही विनंती या अर्जात करण्यात आली आहे.