सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
खंडाळा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सर्व जागांवर बाजी मारत संस्थापक पॅनलचे शंकरराव गाढवे यांच्यासह सर्व उमेदवारांचा धुव्वा उडवत कारखान्याच्या चाव्या हातात घेतल्या.
या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांचाच जलवा स्पष्टपणे दिसून आला. संस्थापक पॅनलने डबघाईस आणून कर्जबाजारी केल्याने नाराज असलेले सभासद याचा पुरेपूर फायदा घेत परिवर्तन पॅनलने बाजी मारत कारखान्यावर सत्ता काबीज केली.
प्रचारादरम्यान एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती मात्र आजच्या एकतर्फी निकालावरून ती चुरस मैदानात अजिबात दिसून आली नाही.
खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखाना लि.म्हावशी ता.खंडाळा जि.सातारा
संचालक मंडळ निवडणूक २०२१ ते २०२६
विजयी उमेदवार
खंडाळा तालुका शेतकरी विकास परिवर्तन पॅनल - नाव व मते..!
व्यक्ती उत्पादक गट क्र.१ - खंडाळा
१) दत्तात्रय उर्फ दत्तानाना नारायण ढमाळ -
3445
२) अशोक संपतराव गाढवे -
3358
३) चंद्रकांत मारुतराव ढमाळ -
3390
व्यक्ती उत्पादक गट क्र.२ - शिरवळ
१) अनंत उर्फ राजेंद्र पांडुरंग तांबे -3518
२) विष्णू यशवंत तळेकर -3426
३) नितीन(बाप्पू) लक्ष्मणराव भरगुडे-पाटील -3532
व्यक्ती उत्पादक गट क्र. ३ - बावडा
१) विश्वनाथ गोविंद पवार -3469
२) रमेश नारायण धायगुडे -3495
३) किसन शामराव धायगुडे -3535
व्यक्ती उत्पादक गट क्र.४ -भादे
१) हणमंत रघुनाथ साळुंखे -3405
२) ज्ञानेश्वर मुगुटराव भोसले -3560
३) साहेबराव आनंदराव कदम -
3453
व्यक्ती उत्पादक गट क्र.५ - लोणंद
१) शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील -
२) धनाजीराव गुलाब अहिरेकर -
३) किसनराव दगडू ननावरे -
अनुसूचित जाती/जमाती-
१) रत्नकांत अनंतराव भोसले -4462
महिला राखीव -
१) शालिनी शंकरराव पवार -
२) शोभा नंदकुमार नेवसे -
इतर मागास प्रवर्ग -
१) सुरेश विठ्ठल रासकर -4285
भटक्या विमुक्त जाती/जमाती -
१) विठ्ठल जयसिंग धायगुडे -4297
संस्था व बिगर उत्पादक -
१) गजानन महादेव धुमाळ -826