सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुख्याध्यापक संघाने आपल्या वंचित विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले ही कौतुकास्पद बाब आहे. मुख्याध्यापक संघाने आणखी पुढाकार घेतल्यास
ज्या मुलांच्या घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोना अथवा कशानेही निधन झाले असेल त्या संबंधित विधवा महिलेस तसेच आई-वडील गमावलेल्या मुलांना संजय गांधी निराधार योजनेतून आर्थिक मदत देता येईल. त्यासाठी प्रस्ताव बनवून द्यावेत ते सर्व मार्गी लावू, असे आवाहन संभाजी होळकर यांनी दिला.
बारामती तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने कोरोनाकाळात पालक गमावलेल्या 104 शालेय मुलांना अडीच लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप एकात्मिक विकास व पुनर्विलोकन शासकीय समितीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या करण्यात आले. कोरोना काळात बारामती तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या निराधार मुलांना शालेय साहित्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाने घेतला होता. तालुक्यातून एकूण 104 मुलांसाठी 31 विद्यालयातील शिक्षकांनी एकूण अडीच लाख रुपये निधी जमा केला.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शंभुसिंह महाराज विद्यालय माळेगाव व विद्या प्रतिष्ठान ल विद्यालय बारामती या तीन ठिकाणी संभाजी होळकर, डॉ. सुनील दराडे यांच्या हस्ते अनुक्रमे 25, 37 व 42 मुलांना धनादेश वितरण करण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे, रमेश गोफणे, मुख्याध्यापक एस. पी. जगताप, आर. इ. शिंदे, डी. सी. धुमाळ, संजय कांबळे, ऍड. रवींद्र माने, बी. बी. रणवरे, अनिल भोसले, संजय वाबळे उपस्थित होते. आर. व्ही. झुरंगे यांनी सूत्रसंचालन केले तर युवराज शिंदे यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष आर. ए. धायगुडे, सहसचिव संदीप जगताप, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष एन. डी. ठेंगल, एस. पी. शेख, जे. पी. नाकुरे यांनी संयोजन केले.
---