सोमेश्वर कारखान्याच्या ऊसतोड हार्वेस्टरची दरवाढीची मागणी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
मोरगाव : सध्या डिझेलची सातत्याने वाढ होत असून डीझेलने शंभरी ओलंडली आहे. ऊस तोडणी हार्वेष्टर मशीन मेंटनस , ऑपरेटर पगार , व डीझेल यांचा मेळ यंदाच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस गाळप हंगामात बसणे अशक्य आहे . यामुळे स्थिर दराने डीझेल द्यावे अथवा गतवर्षीच्या एकूण कमीशनच्या पंचवीस टक्के दरवाढ करावी अशी मागणी निवेदणाद्वारे पुणे जिल्हा हार्वेष्टर मालक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत हंबीर भापकर व पदाधीकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना निवेदणाद्वारे केली आहे .
गतवर्षी कोरोना काळात ऊस तोडणी मजुरांचा तुटवडा भासु नये म्हणून बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्म आवाहन केल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीचे हार्वेष्टर मशीन घेतले. या मशीन मालकांना ऊस तोडणी पोटी प्रती टनास ३८३ रुपये मिळतात . मात्र गतवर्षाच्या तुलनेत डीझेलची सातत्याने दरवावाढ होऊन प्रती लिटर दर शंभर पेक्षा अधीक झाला आहे . यांमुळे डीझेल , हार्वेस्टर मशीन मेंटनस , चालकाचा पगार यांचा खर्च काढल्यास प्रती टन ऊस तोडणीस मशीन मालकांना खिशातील पैसे टाकावे लागणार आहे .
यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस गाळप हंगाम सण २०२१ - २२ साठी हार्वेस्टर ऊस तोडणी मालक संघटनेने गतवर्षीच्या तुलनेत ऊस तोडणीस पंचवीस टक्के दरवाढ करावी अथवा स्थिर दराने म्हणजे प्रती लिटर साठ ते पासष्ट रुपये दराने डीझेल मिळण्याची मागणी निवेदणाद्वारे उपमुख्यमंत्री पवार यांकडे केली आहे . तसेच मागणी मान्य न झाल्यास कारखाना परीसरात एकही ऊस हार्वेष्टर मशीन चालु न देण्याचा ईशारा हनुमंत भापकर यांनी दिला आहे .