धक्कादायक ! वैशालीने दोनशे वेळा i love u लिहलं आणि गळफास घेतला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका मेडिकल विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. 
         या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. डॉक्टर तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येआधी तिने एका कागदावर तब्बल 200 वेळा 'आशिष LOVE वैशाली' असं लिहिलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीर्थंकर महावीर विद्यापीठातील मेडिकल विद्यार्थिनी डॉ. वैशाली चौधरी हिने तिच्या हॉस्टेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांना तिच्या खोलीत एक कागद सापडला. या कागदावर जवळपास 200 वेळा "आशिष लव्ह वैशाली" असं लिहिलं होतं. त्यावरून पोलिसांनी आशिषचा शोध घेतला असता त्यांना वैशालीच्या प्रेमप्रकरणाचा शोध लागला. डॉ. आशिष जाखड आणि वैशाली हे एमबीबीएसचं एकत्र शिक्षण घेत होते. या काळात त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. 
To Top