सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
माजी केंद्रीय क्रुषी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा कोमल निगडे, निरा शहर अध्यक्षा तनुजा शहा, निरा शहर ओ.बी.सी. सेल अध्यक्ष सुनिल पाटोळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. निरा येथील सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळा येथे मुख्याध्यापिका सुवर्णा बोडरे, पर्येवेक्षक लोहकरे, सह शिक्षिका रुपाली रणनवरे, सपना ओव्हाळ, शितल शिंदे उपस्थित होत्या. महात्मा गांधी विद्यालय निरा येथे पर्येवेक्षक जे.एन. दाभाडे, सह शिक्षक बी.बी. धायगुडे, एस. बी. पवार, एस. एन. कुंभार, के.डी. वाघ, शिक्षकोत्तर कर्मचारी जे.एन. गायकवाड, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळुंचे येथे मुख्याध्यापक एन.व्ही. ओव्हाळ, बी.आर. राऊत, एस. डी. कदम उपस्थित होते.
COMMENTS