सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून तालुक्यात ११५ गावांपैकी तब्बल ६२ गावांमध्ये कोरोनाचा एकही पेशेंट नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहर व ग्रामीण भागात काल दि १८ रोजी ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्या तालुक्यात ६५ ऍक्टिव्ह रुग्ण असून ११४ गावात ५ पेक्षा कमी रुग्ण संख्या आहे. मात्र एकमेव खांडज कोरोनाचा आकडा ६ वर आहे. तरीदेखील नागरिकांनी गाफील न राहता मास्क चा वापर करावा तसेच सणासुदीला खरेदीला जास्त गर्दी न करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केला आहे.