सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : आज मंगळवार दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी कोजागिरी/शरद पौर्णिमा आहे. देशाचे नेते,माजी केंद्रीय मंत्री व पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे जीवनातील येणाऱ्या एकूण पौर्णिमा पैकी ८१ व्या वर्षांतील १००० वी "कोजागिरी/शरद पौर्णिमा" आहे. यानिमित्ताने अष्टविनायक प्रथम तिर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथे मयुरेश्वरास अभीषेक पुजा सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे व संचालक शैलेश रासकर यांच्या हस्ते करण्यात आला .
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या आयुष्यातील एक हजार वी शरद पौर्णिमा आहे . या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे व संचालक शैलेश रासकर यांच्या हस्ते मयुरेश्वराराची आरती व अभिषेक पुजा केली , यावेळी मोरगावचे सरपंच निलेश केदारी, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष तानाजी कोळेकर , माजी सरपंच पोपट तावरे , बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष अक्षय तावरे .मा. चेअरमन, श्री मोरया विकास सोसायटी, संजय तावरे,पांडुरंग गारडे ,संतोष केदारी, चांगदेव ढोले, शंकर ढोले, सखाराम तावरे, व मोरगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद पवारांच्या जीवनातील हा व्यक्तिगत प्रवास सर्वांच्या कुटुंबातील एक आनंद उत्साह व प्रेरणादायी दुग्धशर्करा योग आहे. यानिमित्ताने साहेबांचे अभिष्टचिंतन करून त्यांना दीर्घायुष्य होवोत व त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्री क्षेत्र मोरगाव येथे मयुरेश्वरा चरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन व नवनिर्वाचित संचालक मा.राजवर्धन दादा शिंदे व सोमेश्वर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक शैलेश रासकर यांच्या हस्ते हा पुजा पाठ , आरती कार्यक्रमाचे करण्यात आला .