जेजुरीनंतर आता मोरगावचा दसरा सोहळा रद्द : बैठकीत ग्रामस्थांचा निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील शुक्रवार   दि .   १५ रोजीचा मयुरेश्वराचा विजयादशमी  पालखी सोहळा कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी बहुमताने  घेतला . या दिवशी  केवळ धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे .दसऱ्या निमित्ताने रावण दहन , फटाक्यांची आतषबाजी  , भुईनळे उडविले जाणार नसून  ग्रामस्थांनी व  भावीकांनी मंदिर , परीसरात  गर्दी  न करण्याचे आवाहन सरपंच निलेश केदारी यांनी केले आहे .

मोरगावचा विजया दशमी सोहळा राज्यातील प्रसिद्ध सोहळ्यापैकी एक मानला जातो.  या सोहळ्याला  राज्या - परराज्यासह ,परदेशी नागरीकही हजेरी लावतात. या  सोहळ्या निमित्ताने  मयुरेश्वर मंदिर फरसावर  आज दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता  समस्थ ग्रामस्थ , मानकरी , पुजारी आदींची बैठक संपन्न झाली . यामध्ये कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव , खबरदारीचा उपाय म्हणून केवळ धार्मिकाच कार्यक्रमाचे  आयोजन करण्याचा निर्णय  बहुमताने निर्णय घेतला  .

दसऱ्या निमित्ताने  दरवर्षी घरोघरी भूईनळे उडवले जातात . स्वहस्ते गंधक , सोडा , कोळसा वापरून शोभेची दारु बनविली जाते . हे दारुकाम  पालखी समोर उडवले  जाते . मात्र आज दि . १३ रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे  . तसेच विजया दशमी निमित्ताने  रावण दहनाचा कार्यक्रमही  होणार नसल्याचे  सरपंच केदारी यांनी सांगितले असून मंदिर व   परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .
To Top