बारामती ! माळेगांव, सांगवी परीसरात घरफोडी करणारा गुन्हेगार जेरबंद : चार गुन्ह्यांची कबुली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
माळेगाव : प्रतिनिधी

गेल्या चार महीन्यापासून बारामती, शारदानगर माळेगांव, सांगवी भागामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदरचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  महेश ढवाण यांनी तपास पथकास अभिलेखावरील आरोपी चेक करणे, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणे वगैरे सुचना दिल्या होत्या.
           दि. २७/०९/२०२१ रोजी सांगवी येथील श्री वरूण तावरे यांचे विजय इंडस्ट्रीज नांवाचे पत्रा बनविण्याची कंपनीमध्ये पत्रा उचकटून त्यावाटे अज्ञात इसमांनी प्रवेश करून घरफोडी चोरी केलेबाबत तकार दिल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन गुर नं. ५६९ / २०२१ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्हयाचे अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशन अंकीत माळेगांव चौकीचे अधिकारी सपोनि श्री राहूल घुगे व स्टाफ, तसेच तपास पथकाचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आजूबाजूचे सिसिटीव्ही व तांत्रीक माहीतीचे आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
         यातील आरोपींचा शोध सुरू असतांना सपोनि  राहूल घुगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सांगवी ता फलटण जि सातारा येथील महेश भिमा शिंदे याने त्याचे साथीदारांसह केला आहे. अशी माहीती मिळताच सदरची माहीती त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढवाण यांना कळविली असता, त्यांनी लागलीच सदरच्या गुन्हेगारास जेरबंद करण्यासाठी सपोनि श्री राहूल घुगे, पोना राजेंद्र काळे, पोशि प्रशांत राउत, दिपक दराडे, तपास पथकाचे पोशि विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहूल पांढरे अशी टिम रवाना केली. सदरच्या टिमने आरोपी महेश भिमा शिंदे यास सांगवी ता बारामती जि पुणे येथून दि. ११/१०/२०२१ रोजी सापळा रचुन शिताफीने अटक केली आहे. आरोपीस मा. न्यायालयाने दि. १४/१०/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि  राहूल घुगे हे करीत आहेत.
           आरोपीकडे तपास करता त्याने वर नमुद गुन्हयासह शारदानगर येथे झालेली एटीएम फोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीचा गुन्हा केल्याचे सांगून गुन्हयाचे ठिकाण दाखविले आहे. देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीचा गुन्हयातील चोरी गेले सोन्यापैकी ४.५ तोळे वजनाचे एकूण २ लाख रूपयांचे सोन्याचे दागीणे जप्त करण्यात आले आहे. सदरबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपीने तपासादरम्यान फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हृददीमध्ये एप्रील २०२० मध्ये साठे फाटा फलटण येथील ए व्ही गार्डन परमीट रूममधून दिड लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीची दारू घरफोडी चोरी करून नेली असल्याची कबूली दिली आहे. सदरबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीने तपासादरम्यान देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील चोरून नेलेले सोन्याचे दागीणे इसम नामे बाळकृष्ण तात्याबा यादव रा सांगवी ता फलटण जि सातारा यांचेकरवी विक्री केल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. त्या गुन्हयाचा तपास सपोनि महेश विधाते हे करीत आहेत.
        सदरचा आरोपी हा फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील आरोपी असून त्याचेवर ११ घरफोडीचे व ०१ दरोडयाचा गुन्हा दाखल आहे. सदरची कामगीरी  पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग  गणेश इंगळे बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि  राहुल घुगे, पोहवा रावसाहेब गायकवाड, शशिकांत वाघ, पोना राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पोशि प्रशांत राउत, दिपक दराडे, तपास पथकाचे पोशि विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहूल पांढरे यांनी केली आहे.
To Top