सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच , महाराष्ट्र राज्य यांचे वतिने बारामती तालुका पंचायत समिती चे माजी सभापती मा. श्री. प्रदिप तुकाराम धापटे यांना 'सामाजिक कार्यकर्ता कोव्हीडयोध्दा' पुरस्कारा आज गांधी जयंती निमित्ताने पुणे येथे आयोजित कार्यक्रमात सुनंदा पवार,व कुंती पवार यांचे हस्ते देण्यात आला ,
प्रदीप धापटे यांनी त्यांच्या पंचायत समिती गणातील कोवीड रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, स्वतः च्या गाडीने रुग्णांना रुग्णालयात पोहचवणे , गरज भासल्यास त्यांना औषधे उपलब्ध करून देणे, त्यांना नाष्टा जेवण याची सोय स्वखर्चाने करत, रूग्ण मृत पावलेल्यास त्यांचे नातेवाईक यांना धिर देऊन , अंत्यविधी करण्या पर्यंत त्यांनी काम केलं.
कोवीड साथ नियंत्रणासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सुचनेनुसार पंचायत समिती गणात ऑंटीजन टेस्ट कॅम्प चे आयोजन केले..या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमस, हडपसरचे आमदार .चेतन तुपे., एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाचे अध्यक्ष, व सदस्य उपस्थित होते