सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याची कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीच्या आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४३० जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यामुळे २० जागांसाठी आता ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तत्पूर्वी ब गटातून राष्ट्रवादी च्या सोमेश्वर विकास पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ६३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील ९६ जनांचे उमेदवारी अर्ज अपात्र झाले होते. उर्वरित ५३५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कृती समिती व भाजप या उमेदवारांचा समावेश आहे. यातील ४६ उमेदवारी अर्ज सोडून ४३० जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले हवेत.
शनिवारी बारामती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यानंतर परवा रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. दरम्यान राष्ट्रवादीच्या यादीवर नाराजांनी थेट भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नाराज प्रत्यक्ष समोर येणार नसले तरी नाराज मतांच्या टक्क्यांच्या फायदा भाजपला होणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या नाराजांनी भाजपची संपर्क केल्याने भाजपने आपली यादी प्रसिद्ध करण्यास उशीर लावला काल दि ४ रोजी भाजपने आपली २० उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
भाजप पुरुस्कृत श्री सोमेश्वर परिवर्तन पॅनेल उमेदवार-----
निंबुत - खंडाळा गट नं १
गडदरे बाबुराव दशरथ
साळुंके श्रीरंग गुलाब
दडस शंकर पोपट
मुरूम - वाल्हा गट नं २
जगताप प्रकाश किसनराव
भोसले संपत रामचंद्र
शेंडकर हनुमंत पांडुरंग
होळ - मोरगांव गट नं ३
पिसाळ विठ्ठल गणपतराव
काजी खलील इस्माईल
होळकर गणपत रामचंद्र
कोऱ्हाळे बुद्रुक - सुपा गट नं ४
खैरे दिलीप शंकरराव
माळशिकारे भगवान वामनराव
गुळमे रामदास राजाराम
मांडकी- जवळार्जुन गट नं ५
धुमाळ अजितकुमार कृष्णाजी किन्हाळे बजरंग निवृत्ती
कुदळे सुरेश गणपत
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी
भोसले भिकुलाल रामचंद्र
इतर मागास वर्गीय प्रतिनिधी OBC
धसाडे ऋषिकेश बाळासो
भटक्या विमुक्त जाती व जमाती
सोरटे आदिनाथ वामन
महिला राखीव प्रतिनिधी
जेधे सुजाता अरविंद
सोरटे बायडाबाई वामन