सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक निवडणुकीत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षाच्या सांगता सभेने प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी दुपारी तीन वाजता सभा आयोजित केली आहे. तर सायंकाळी चार वाजता भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलची सभा भाजप किसान मोर्चाचे राजाध्यक्ष वासुदेव काळे व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या उपस्थितीत करंजेपुल या ठिकाणी आयोजित केली आहे.