सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर-महाडला जोडणाऱ्या जवळच्या मार्गावरील वरंध(वाघजाई घाट)ता.भोर येथे शुक्रवार दि-१२ सकाळी १०च्या दरम्यान महाडच्या हद्दीतील तिसऱ्या वळणावर भले मोठे अवजड वाहन अडकल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.मात्र महाड ,भोर बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने तात्काळ प्रयत्न करून अडकलेले अवजड वाहन रस्त्यातून बाजूला केले व वाहतुकीस रस्ता मोकळा केला.
वरंध ता.भोर घाटात जड वाहनांना प्रवास करण्यास बंदी असतानाही वाहनचालक मनमानी करून घाटातून वाहने चालवीत असतात.या वाहनचालकांच्या मुजोरीमुळे जडवाहने वारंवार घाट वळणांवर अडकण्याची प्रकार होत असल्याने इतर वाहनचालकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ही वारंवार होणारि वाहतूकीची अडचण दूर करण्यासाठी महाड व भोर सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांकडून जोर धरत आहे.