भोर ! सारोळा येथे विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
विहिरीलगत असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली खेळत असताना विहिरीत पडलेल्या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. 
 भोर तालुक्यातील सारोळा येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वराज विजय धाडवे (वय ८, रा. सारोळा, ता. भोर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वराजचा आतेभाऊ रोहित राजकुमार पाटील याने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
     रोहित आईसह दिवाळीसाठी मामाकडे सारोळा येथे आला होता. मंगळवारी धाडवे कुटुंबीय भात कापणीसाठी शेतामध्ये गेले होते. दुपारी स्वराज त्याची बहीण संचिता आणि रोहित शेतातील विहिरीलगतच्या कडुनिंबाच्या झाडाखाली खेळत होते. काही वेळानंतर स्वराज दिसेनासा झाल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. यावेळी स्वराजची चप्पल शेतातील विहिरीत तरंगताना दिसली. स्थानिकांनी विहिरीत शोध घेतल्यानंतर स्वराजचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे सारोळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
To Top