पुरंंदर ! वीर येथे ३० ते ३५ जणांनी घेतला जमीनीचा जबरदस्तीने ताबा : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
 वीर, (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील फिर्यादी- विजय दगडू वचकल यांच्या ताबेवाटीत असणारे क्षेत्र गट नंबर 2216 मधील रोडचे कडेला असणारे मकेच्या शेतात जबरदस्तीने घुसुन ताबा घेण्यासाठी आलेल्या १३ आरोपी सह अज्ञात २०त२५ आरोपीनी फिर्यादी ला मारहान करुन ”तुम्ही या जमीनीत पाय ठेवायचा नाही नाहीतर तुम्हाला येथेच गाडून टाकू “ आशी धमकी दिली आसल्याची फिर्याद सासवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

       यासंदर्भात आरोपी - अशोक कृष्णा वचकल, सोमनाथ विठठल वचकल, भरत बाजीराव वचकल, संजय बाजीराव वचकल, चंद्रकांत राजाराम वचकल, सावता राजाराम वचकल, वनिता चंद्रकांत वचकल, पंकज सुरेष शिवरकर,  स्वप्नील अषोक वचकल, अ.नं. 1 ते 9 रा.वीर (माळवाडी), ता. पुरंदर, जि.पुणे, लिलाबाई जयंसिग भुजबळ (रा.माळीबेन, झणझणे सासवड ता.फलटण जि.सातारा) , शर्मीला सुनिल वाघोले (रा.नवलेवाडी ता.पुरंदर जि.पुणे) 
        त्रयस्त इसम  नामदेव एकनाथ जगताप (रा.ताथेवाडी सासवड ता.पुरंदर, जि.पुणे), संतोष भगवान भांडवलकर (रा.सेानोरी ता.पुरंदर, जि.पुणे) व त्यांचे 15 ते 20 साथीदार नाव पत्ता माहिती नाही याच्या विरोधात फिर्यादी विजय दगडू वचकल (वय.35 व्यवसाय शेती रा.वीर माळवाडी. ता.पुरंदर, जि.पुणे)  यांनी गुन्हा दाखल केले आहे.
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दि.10 /11 / 2021 रोजी सकाळी 11: 30 वा.चे सुमारास मौजे वीर, ता.पुरंदर, जि.पुणे येथील आमचे ताबेवाटीत असणारे क्षेत्र जमिन गट नंबर 2216 मधील रोडचे कडेला असणारे मकेच्या शेतात अनाधिकाराने प्रवेश केला. 
        सदर जमीनीचा ताबा घेण्याचे उदेषाने आले. त्यांचेपैकी अशोक कृष्णा वचकल, भरत बाजीराव वचकल, संजय बाजीराव वचकल, सोमनाथ विठठल वचकल यांनी मला हाताने लाथाबुक्कानी मारहाण केली. माझी पत्नी सौ सारिका हिस संजय बाजीराव वचकल याने हाताने मारहाण केली.
       माझा लहाण भाऊ योगेश यास शिवीगाळ केली. "तुम्ही या जमीनीत पाय ठेवायचा नाही नाही तर तुम्हाला येथेच गाडून टाकू" असे म्हणाले. सोबत आणलेले दोन लोखंडी बोर्ड आमचे वरील शेतात जबरदस्तीने गाडले व शिवीगाळ दमदाटी करुन आम्हाला आमचे शेतातून हाकलून दिले. पुढील तपास सासवड  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत
To Top