सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मा. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधि सेवा समिती यांच्या आदेशाप्रमाणे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत रवीवार ता १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे बारामती तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा .जे.पी. दरेकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करणेत आले आहे .
उत्कर्ष बालसदन या आश्रमशाळे मधे सर्वसामान्य नागरीकाना मोफत कायदेविषयक मदतीच्या पद्धती ,विनाखर्चात अल्प उत्पन्न धारकाना न्यायालयीन सुविधा आदी विषयावर जिल्हा न्यायाधीश डी .बी. बांगडे व जिल्हा न्यायाधीश जे.ए .शेख हे स्वत:मार्गदर्शन करणार आहेत .बारामती वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड चंद्रकांत सोकटे ,विधी सेवा समिती सदस्य ॲड.जी.एम.आळंदीकर यांचे ही विधी सेवा समिती व जेष्ठ नागरीक कायद्यावर मार्गदर्शन होणार आहे .तरी जास्तीत जास्त नागरीकानी कायदेविषय माहीती प्राप्त करणेसाठी उपस्थीत राहावे असे आवाहन बारामती वकिल संघटनेतर्फे करण्यात आले आहे .
सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या मोफत कायदेविषयक शिबीराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष ॲड.अजिंक्य सावंत व ग्रामपंचायत सदस्य ॲड. हेमंत गायकवाड यांचे वतीने देखील करणेत आले आहे.
COMMENTS