सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाणेवाडी(ता.बारामती) येथील २७ ऑक्टोबर रोजी कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा तातडीने घेण्याची मागणी ॲड. नवनाथ भोसले यांनी केली आहे. याबाबत शुक्रवारी भोसले यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून यामध्ये म्हटले आहे की, ग्रामसभा तहकूब झाल्याने गावातील ऐरणीवर पडलेले प्रश्न व गावातील विकासकामे खोळंबली आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात ग्रामसभा झालेल्या नाहीत. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली. मात्र ग्रामसभेला बहुतांश सदस्य गैरहजर राहत असल्याने ग्रामसभा तहकूब कराव्या लागतात. तहकूब झालेल्या ग्रामसभा लवकरात लवकर घेऊन गावातील विकास कामे लवकर मार्गी लावावीत अशी मागणी ॲड. नवनाथ भोसले यांनी केली. वाणेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी. के. गाढवे आणि उपसरपंच संजय जगताप यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.