सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मराठी पत्रकार परिषद चे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन देि २७ आणि २८ डिसेंबर रोजी उरुळी कांचन येथे होणार असून याबाबत पुरंदर तालुका पत्रकार संघाची शिवरी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी अधिवेशन बाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा आणि अधिवेशनाचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुरंदर तालुका पत्रकार संघात काही रिक्त पदे झालेली होती त्यावर रामदास राऊत यांची पुरंदर तालुका पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर, कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, दत्ता नाना भोंगळे, बी एम काळे, किशोर कुदळे, सोशल मीडिया अध्यक्ष विनय गुरव, सचिव स्वप्नील कांबळे इतर कार्यकारिणी उपस्थित होते.