सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे बु। भाऊबिज दिवाळीचा तिसरा दिवस, घरो घरी गोड - धोड , नविन कपडे सर्वत्र आनंदी आनंद ...परंतु ऊस तोड मजुरांच्या नशीबी मात्र अपारकष्टच..पहाटे उठायचं टोपल्यातलं शीळ भाकरीचं तूकडं आणि चटणी घयेची आणि उसाचा फड गाठायचा....लहान लेकरांना उसाच्या पाचटात सोडायचं आणि ऊस तोडायचा हा रोजचा दिनक्रम.... कशाची दिवाळी आणि कशाची भाऊबीज…….ह्या कष्टाची जान कोऱ्हाळे बु।। येथील पंचायत समितीचे गटनेते प्रदिप बापु धापटे मित्र मंडळाने जानली .. आणि प्रती वर्षी प्रमाणे ऊस तोड मजुरांची दिवाळी गोड धोड करण्याचे ठरवले मिठाई लाडू, चिव़डी, बालुशाही मिष्ठान्न ची व्यावस्था प्रदिप (बापु) धापटे यांनी केली सकाळी - सकाळी लगबग सुरू झाली मित्र मंडळ कठीण पुला जवळील ऊसाच्या फडात एकत्र जमा झाली … आणि ऊस तोड मुरांची दिवाळी साजरी केली . सर्वांना गोड धोड मिठाईचे वाटप केले ...त्याळी लहान मुलाच्या चेहऱ्यावर स्मीत पहण्या सारखे होते..यावेळी पंचायत समिती सदस्य व गटनेते प्रदिप धापटे , फलटण चे महसुल नायबतहसिलदार.नामदेव काळे, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस IT सेल चे अध्यक्ष प्रमोद पानसरे,.संजय निकम, रामदास धापटे, शाम काशवेद,.सुनिल भोसले, .ईश्वर निंबाळकर, सचिन घाडगे,.नितीन जगताप,.जितेंद्र थोपटे,.राजेंद्र भोजने,.अंकुश शिरवाळे, सोमेश्वर कारखान्याचे चिटबॉय.मतकर उपस्थीत होते. मित्र मंडळ नेहमी रक्तदान शिबीरे, अपंग कल्याण कार्यक्रम, कोवीड -१९काळातील सेवा भावी काम, गरजु विद्यार्थांना अर्थसहाय्य,रूगण सेवा अशी कामे करत असतात या कामाचे कौतुक नामदेवराव काळे यांनी केले.