बारामती ! लोणी भापकर येथील भैरवनाथमंदिरात दिपोत्सव साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 लोणी भापकर ता. बारामती  येथील  ग्रामदैवत  काळ भैरवनाथ मंदिरात लोणी भापकर मधील  भैरवनाथ एकता ग्रुप च्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला.
            सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा सण  पाडव्याच्या  रात्री १०००  दिवे  लावल्याने  मंदिर अक्षरशः उजळून निघाले. 
यावेळी ग्रुप च्या वतीने सांगितले कि,  गावामध्ये असेच  सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
 यावेळी  भैरवनाथ एकता ग्रुप चे सदस्य अमोल मदने, अमोल सकाटे ,अनिल भापकर, अविनाश बनसोडे, प्रदिप मदने ,नंदकुमार मदने व दत्तात्रय बनसोडे सिद्धार्थ कडाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top