सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील सूपे मार्गे काळखैरेवाडी ते लोणीपाटी दरम्यान स्विफ्ट आणि सेलेरिओ गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक झाली असून वाहनचालक तसेच दुचाकीस्वार मेटाकुटीला आला आहे. गेली दोन वर्षे बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून पण त्यांच्या कडुन फक्त उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत या रोडवर सतत लहान मोठे अपघात घडत आहेत काल भाऊबीजेच्या दिवशी या रोडवर दोन चार चाकी गाडींचा भिषण अपघात झाला यामध्ये स्विफ्ट गाडी पलटी होऊन चार जण जखमी झाले आहेत.
बांधकाम विभाग आता या रोडवर मोठी जीवितहानी होण्याची वाट बघत आहे काय? अशा संतप्त प्रतिक्रिया येथील नागरीकाकडून येत आहेत तातडीने या रस्त्याचे काम जर आता सूरू नाही केले तर बांधकाम विभागाच्या कार्यालयाला बाबूर्डी तसेच काळखैरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोकण्यात येणार आहे अशी माहिती बाबूर्डी येथील राजकुमार लव्हे यांनी दीली आहे
COMMENTS