पोटनिवडणुकात बॅकफूट बसल्याने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त का?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
 देशात काल झालेल्या विविध पोटनिवडणुकांत भाजपला दणका बसल्याने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलमध्ये पाच रुपयांनी आणि डिझेलमध्ये दहा रुपयांची घट होण्याची चिन्हे आहेत. या निवडणूक निकालाच्या दणक्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर कमी झाले तरी पेट्रोल शंभरच्या वरच राहणार आहे.
         त्यामुळे पुण्यासारख्या शहरात पेट्रोल आता 115.52 रुपयांवरून 110 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेल हे 104.67 पैशांवरून पुन्हा शंभर रुपयांच्या आत म्हणजे 94 रुपये प्रति लिटरने मिळेल. हे दर तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
To Top