बारामती ! चालू रस्ताच्या कामावर मलमपट्टी करण्याची वेळ आलीच कशी?...निधी अपुरा पडला की ? काम करायला चिकाटपणा केला? रस्ता पाहायचा असेल तर या 'सोमेश्वरनगर'ला

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्याची मलम पट्टी करण्याची वेळ आल्याचे आपण पाहिले नसेल तर या सोमेश्वरनगर'ला ...आणि निरा बारामती रस्तावरून जरासा फेरफटका मारून जा. ही हकीगत आहे. निरा बारामती रस्त्याची."कासवगतीने सुरू असलेले काम तरी अजून दोन-चार महिने थांब" अशी गत रस्त्याची झालीय.
         सोमेश्वरनगर येथे निरा -बारामती रस्ताचे काम सध्या सुरू आहे.पण रस्ता अजून पूर्ण होण्याच्या अगोदरच उखडून पडला आहे.त्यावर कोणाचे नियंत्रण आहे का? असा सवाल या ठिकाणा वरून जाताना वाहन चालक विचारू लागलेत. 
     नुकताच झालेल्या घाडगेवाडी (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांचे भाषण सुरू असताना येथील ग्रामस्थाने निरा-बारामती रस्ता पूर्णपणे खचला आहे. जागोजागी खड्डे आहेत,  अशी तक्रार पवार यांच्याकडे केली. यावर पवार म्हणाले, आता एकच सांगतो येथून पुढे कोणत्याही रस्त्याचे काम सुरू असले आणि त्याची क्वालिटी नीट नसेल तर रस्त्यावर आडवं पडून रस्ता बंद पाडायचा. तुम्ही रस्त्याचे काम आडवलं तर मला येथील बांधकाम अधिकारी सांगतील, दादा येथे रस्त्याचे काम अडवलं आहे. त्यावेळी मी सुद्धा आमच्या कार्यकर्त्याने काम अडवलं असेल तर तिथे काहीतरी चुकीचे काम सुरू आहे. ते सुधारा अशा सुचना मला करता येतील. मी तुम्हाला हात जोडून सांगतो. आपण आपल्या रस्त्याची व विकास कामांची गुणवत्ता चांगली ठेऊ. असे बोलले होते.
     अजित पवार राज्याचा कारभार बघत बारामतीत वेळ देऊन दर्जेदार कामे होण्यासाठी कामांच्या ठिकाणी वेळ देऊन पहाणी करतात. आणि सूचना करतात. तालुक्यात सध्या सगळीकडे विकासकामे सुरू आहेत. आता याच रहदारी असलेल्या निरा बारामती रस्ताचे काम सध्या सुरू असून रस्ता उखडलेला दिसतोय पण या कामाकडे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे का? दर्जा राखण्यासाठी, कामावर अंकुश ठेवण्यासाठी कार्यकर्ते पुढे येणार का? की, अजित पवार यांनाच लक्ष द्यावे लागणार असा सवाल नागरिकांच्यात उपस्थित होत आहे.
To Top