'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रातील तीन वर्षात तब्बल १ लाख ३३ हजार टन ऊस विजवाहक तारांमुळे जाळला : महावितरण कडून भरपाई मिळण्यासाठी मा. कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या मागील तीन वर्षात तब्बल १ लाख ३३ हजार टन ऊस हा महावितरण च्या ऊस शेतीवरून गेलेल्या विजवाहक तारांमुळे जाळला आहे याबाबत संबंधित शेतकऱ्याला महावितरण कडून भरपाई मिळावी अशी मागणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी केली आहे याबाबत त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन दिले आहे.
यावेळी सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे, बाळासाहेब कामठे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
मागील तीन वर्षांत ऊस जळीताचा अभ्यास केला असता अशी आकडेवारी समोर आली.
सन २०१८ ते २०१९ च्या हंगामात ५७९२४.९३९ मे. टन
सन २०१९ ते २०२० च्या हंगामात ७९६५.५९० मे. टन
सन २०२० ते २०२१ च्या हंगामात ६७१६७.०९६ मे. टन
या मगील तीन हंगामातील बहुतांशी ऊस जळीत असण्याचे कारण शेतक-यांच्या बांधावरून जाणा-या बीज कंपनीच्या तारा व त्या तारांना झोळ असण्याचे प्रमाण, तारा शेतीच्या मध्यातून जाण्याचे प्रमाण, ट्रान्सफार्मर मधून ठिणग्या पडण्याचे प्रमाण, खांबावरचे कप फूटण्याचे प्रमाण इत्यादी कारणे शेतक-याचा ऊस जळीत होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
ऊस जळीत झाल्यानंतर शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. जसे की ऊसाचे वजन कमी भरणे, ऊस कपाती दरात दयावा लागणे, अवेळी पीक काडावे लागणे या सर्व नुकसानाला शेतक-याला दर वर्षी सामोरे जावे लागत आहे. या नुकसानीचा विचार केला तर प्रती एकरी सरासरी १०००००/- रू नुकसान शेतक-याला सोसावे लागते. शेतक-याचे हे नुकसान वीज कंपनीमुळे होते पण आजपर्यंत आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एकाही सभासदाला कंपणी मार्फत कोणताही नुकसान भरपाईचा लाभ मिळाला नाही.
शेतकरी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वीज कंपनीची सर्व प्रकीया पार पाडतो परंतू त्याला नुकसान भरपाईचा लाभ घेता येत नाही या करता वीज कंपनीचा स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे वाटते तो स्वतंत्र अधिकारी या सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा करेल व शेतक-याला त्याची नुकसान मिळवून देण्यास मदत करेल. म्हणून आपण विज कंपनीला आदेश दयावेत की शेतक-याला त्यांच्या नुकसान भरपाईचा त्वरीत लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवरण अधिकारी नेमावा व त्याच्या नुकसान 'भरपाईची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था करावी. या साठी आपल्या स्तरावरून संबंधित विभागास आदेश व्हावेत अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.