सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
सासवड ते कापूरहोळ या महामार्गावर ईरटीका गाडी ने विरुद्ध बाजूस येऊन जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला असल्याची फिर्याद नवनाथ नारायण बाठे (वय ५० रा. देवडी ता.पुरंदर जि.पुणे) यांनी सासवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 30/10/2021रोजी दुपारी 3/30 वा. चे सुमारास मौजे देवडी ता.पुरंदर जि.पुणे गावचे हद्दीत सासवड ते कापुरहोळ जाणारे रोडवर मणगे वस्ती समोर असणारे रोडवर मी रस्ता क्राँस करीत असताना सासवड बाजुकडुन येणारे इर्टीगा गाडी नं MH12 SU 7157 हीने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन वाहन वेगात चालवुन रोडचे विरुध्द बाजुला येवुन माझे ताब्यात असणारी बजाज प्लँटीना मोटार सायकल नं MH12 RL8443 हीस माझे उजवे बाजुने ठोस मारुन माझे व माझा भाऊ विठ्ठल बाठे यांचा किरकोळ व गंभीर दुखापतीस तसेच मोटार सायकलीचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन माझी त्या इर्टीगा गाडीवरील चालकाविरुध्द तक्रार दाखल केली आहे या घटनेचा तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.