सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती ! कोऱ्हाळे गावचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षकाची पिंपरी चिंचवडमध्ये दमदार कामगिरी : २५० लोकांची २ कोटींची फसवणूक करणारा आरोपी केला जेरबंद

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, असे सांगून नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्यांची परस्पर विक्री केली.
या प्रकरणी खेड तालुक्‍यातील माजी सरपंचाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी 96 लाख रुपये किंमतीच्या 20 महागड्या गाड्या हस्तगत केल्या आहेत.
सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो साबळेवाडीचा 2014 मध्ये सरपंच होता.
      माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या. ती मी भाड्याने लावतो, असे सांगून सरपंच नागरिकांना गाडी घेण्यास भाग पाडत असे. ती गाडी भाड्याने घेतल्यावर काही महिने त्यांना भाडे देत असे. त्यानंतर त्या गाड्यांची इतर जिल्ह्यात जाऊन नागरिकांकडे गहाण ठेवत असे.
ज्याची गाडी आहे तो जुगारात हरला आहे. तो कर्जबाजारी झाल्याने त्याने माझ्याकडे गाडी गहाण ठेवली आहे. आता तो गाडी सोडवून नेईल, असे वाटत नाही. त्यामुळे ती गाडी तुमच्याकडे गहाण ठेवा, असे सांगून तो इतर जिल्ह्यातील नागरिकांना महागडी गाडी देत असे. आलेल्या पैशातून मौजमजा करीत असे. आत्तापर्यंत त्याने खेड तालुक्‍यातील 55 जण, दौंड-बारामती येथील 20, पिंपरी चिंचवड शहरातील 70 आणि इतर ठिकाणचे नागरिक असे एकूण 200 ते 250 जणांची फसवणूक केली आहे.
आरोपीबाबत पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. आरोपीला पोलिसांत अनेक नागरिकांनी तक्रार दिल्याचे समजल्याने तो आरोपी पोलिसांना सतत पोबारा देत होता.   तो बीड येथे लपून बसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साबळे व एन. पी.पोटे यांना मिळाली. त्यांनी बीड येथे जाऊन वेशांतर करून २ दिवस दबा धरून बसून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून १ कोटी ९६ लाखांच्या २० गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 
       पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साबळे हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु गावचे रहिवासी आहेत.    या कामगिरीमुळे त्यांनी कोऱ्हाळे बु गावाचे व पोलीस दलाचे नाव रोशन केले आहे. 
      इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असून आरोपींकडून इतर वाहने जप्त करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
        सदर उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपनिरीक्षक साबळे व त्यांच्या टिमला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रशस्तीपत्र व रोख २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
सदर कामगिरी मा. श्री. कृष्ण प्रकाश सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड मा. श्री. डॉ संजय शिंदे सो अप्पर पोलीस आयुक्त, मा. श्री मंचक इप्पर सो, पोलीस उपायुक्त परि. १, मा . श्री. सागर कवडे सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, श्री. भास्कर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री, जितेंद्र कदम पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक प्रशांत साबळे पोलीस हवालदार बोयणे, पोलीस हवालदार राजू जाधव, पोलीस नाईक अजय डगळे, पोलीस नाईक बाळासाहेब विधाते, पोलीस नाईक पोटे, पोलीस शिपाई सागर जाधव,  पोलीस हवालदार राजू जाधव, कॉन्स्टेबल सचिन जाधव पोलीस शिपाई आशिष गोपी यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती ! कोऱ्हाळे गावचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षकाची पिंपरी चिंचवडमध्ये दमदार कामगिरी : २५० लोकांची २ कोटींची फसवणूक करणारा आरोपी केला जेरबंद
बारामती ! कोऱ्हाळे गावचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षकाची पिंपरी चिंचवडमध्ये दमदार कामगिरी : २५० लोकांची २ कोटींची फसवणूक करणारा आरोपी केला जेरबंद
https://lh3.googleusercontent.com/-yRFRWrSF_BY/YYPNDlVMu1I/AAAAAAAAMCs/xrM1TqCa2fMbWD6QLwoFAUHqMHZxOIDeQCLcBGAsYHQ/s1600/1636027659210043-0.png
https://lh3.googleusercontent.com/-yRFRWrSF_BY/YYPNDlVMu1I/AAAAAAAAMCs/xrM1TqCa2fMbWD6QLwoFAUHqMHZxOIDeQCLcBGAsYHQ/s72-c/1636027659210043-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_4.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_4.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy