सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर-प्रतिनिधी
भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांची आवक सुरू होती. मंगळवार आणि बुधवार या दिवशी फुलांना योग्य १०० ते १२० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला.
मात्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच बाजारभावाट घसरण झाल्याने ४० रुपये किलोने शेतकऱ्यांना झेंडू फुले विक्री करावी लागल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला होता. भोर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी झेंडूची लागण केली होती. झेंडूचे मळे जोरदार फुलले असल्याने बाजारात फुलांची आवक वाढली गेली यामुळे बाजारभाव पडल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.