बारामती ! सोमेश्वरनगर मध्ये झेंडूने खाल्ला भाव : सकाळी पन्नासवर असणारा दर सायंकाळी दोनशेवर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
वर्षांतला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी या सणानिमित्ताने बाजारपेठेमध्ये फार मोठी आर्थिक उलाढाल होत असते .या उत्सवामध्ये कपड्यांपासून  ते फुलापर्यंत मोठी मागणी बाजारपेठेत असते. त्यामुळे बाजारपेठ फुलून गेलेली असते. 
              दि ३ रोजी सोमेश्वरनगर येथील बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने काल दर प्रतिकिलो २५ रुपये असा राहिला .आज सकाळी दि ४  मागणीत थोडी वाढ झाल्याकारणाने ५० ते ६०  रु   प्रति किलो दरम्यान झेंडूच्या फुलांची विक्री चालू होते मात्र सायंकाळी ५ च्या पुढे  झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली आणि मागणी वाढली तब्बल दोनशे रुपये प्रतिकिलो या दराने झेंडू ग्राहकांना विकत घ्यावा लागला .त्यामुळे सोमेश्वरनगर परिसरात ज्याचा झेंडू त्याची चांदी अशी चर्चा रंगली होती
To Top