सोमेश्वर रिपोर्टर टीम ---------
सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे मैदान मेणबत्तीच्या प्रकाशने तेजोमय झाले .सैनिक व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांकडून या मैदानाला मेणबत्त्यांची आरास करण्यात आली आहे .
या मैदानावर सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील शेकडो युवक दररोज भरतीपूर्व प्रशिक्षणाचा सराव करत असतात त्यामुळे त्यांचे या मैदानाशी एक वेगळेच नाते आहे .ज्या मैदानामुळे आम्ही तयार होऊन आमचं भविष्य तयार होणाऱ्या त्या मैदाना बद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीचे औचित्य साधत या मैदानाला आम्ही छोट्या मेणबत्त्यांची आरास केल्याचे युवकांनी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना सांगितले