सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नव्या पिढीच्या मुलांनी वेगळं तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसायात उतरले पाहिजे.ऊस पिकाला फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग राबवण्याची गरज असल्याचे सांगुन ऊस पीक हे आळशी माणसाचं काम असून उसात पाणी सोडून गावातल्या चौकात जाऊन दुसऱ्या गावाच्या गप्पा मारायच्या अशा कानपिचक्या मा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्या.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी दीपक जगताप यांच्या अंजीर बागेला खा. शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी पवार बोलत होते.
माळरानावर बहरलेली अंजिराची निरोगी बाग पाहून दीपक जगताप यांचे केले कौतुक, होणारा खर्च , मिळणारे उत्पन्न, बाजारपेठ आदी बाबत केली चौकशी केली
सतीश उरसळ यांचे चिरंजीव रोहन उरसळ यांनी पुरंदर हायलाईन नावाने मार्केटिंग कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना लागण ते विक्री पर्यंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शन खाली बांधावर जाऊन सेवा देण्यात येते या कामी सुरुवाती पासूनच रोहन उरसळ व खा. शरद पवार यांच्यात संवाद होता. सतीश उरसळ यांचा पिढीजात फळ विक्रीचा मोठा व्यवसाय असलेने नव्या पिढीने काळानुसार बदल करून व्यवसायात उतरलं पाहिजे त्यानुसार स्वतः शरद पवार यांनी रोहन उरसळ यांना मार्गदर्शन करून वरिष्ठ मान्यवरांच्या बैठका घडवून दिशा दिली होती. डाळिंब,अंजीर, आंबा इत्यादी फळांना हक्काची बाजार पेठ मिळवून जास्तीचे चार पैसे कसे मिळतील हा उद्देश ठेऊन रोहन ने काम सुरू असल्याचे खा पवार यांनी सांगितले.
नव्या पिढीच्या मुलांनी असं तंत्र वापरून उतरलं पाहिजे मला समाधान वाटते अश्या शब्दात त्यांनी दीपक जगताप यांचे कौतुक केले. या वेळी खा. पवार म्हणाले की उत्कृष्ट बाग मालकांनी आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती देऊन आणखी शेतकरी उभे करावेत हा सल्ला दिला. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बी जी काकडे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे ,ऋषी गायकवाड, अभिजित काकडे नितीन निगडे, महेश काकडे, कांचन निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कांचन निगडे यांना वाढदिवसानिमित्ताने खा. पवार यांच्या सन्मानित करण्यात आले.
---------------------------
सोमेश्वर चा दर राज्यात एक नंबर-------
सोमेश्वरच्या निकालाबाबत समाधान व्यक्त करत सभासदांचे आभार मानले. मात्र सध्या बाहेर फिरताना सोमेश्वरमुळे आम्हाला त्रास होतो कारण सोमेश्वर रिकव्हरी पहाता राज्यात एक नंबर चा दर देत असल्याचे पवार यांनी सांगितले.