सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगांव ता . बारामती येथील मोरया सायकल कल्बच्या बारा युवकांनी सायकलवरुन अष्टविनायक यात्रा पुर्ण करण्याचा अनोखा उपक्रम पुर्ण केला . तब्बल सहाशे किमी अंतर अवघ्या सदोतीस तासात पुर्ण केले असुन या सायकल स्वारांनी गावोगावी सायकलींग चे महत्व पटवुन दिले.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील युवक दररोज सायकल सवारी करुन व्यायाम व पर्यावरणाच्या दृष्टीने सायकलिंग किती महत्वाची आहे याचे महत्व पटवुन देत आहेत . रवीवार दि . ७ रोजी पहाटे मोरगांव येथील मयुरेश्वर दर्शन घेऊन या सायकल कल्बचे काका कुतवळ , नाना नेवसे , विकास गुरव , वैभव शिंदे , सागर भोंडवे , नितीन तावरे , सागर उबाळे , रीतेश चांदगुडे , योगेश बोरकर ,रोहीत गुरव , सोमनाथ साळुंके , बाबुराव भापकर यांनी अष्टविनायक यात्रेस सुरवात केली .
मोरगाव , सिद्धटेक , रांजणगाव , ओझर , लेण्याद्री , पाली , महड , थेऊर व पुन्हा मोरगांव असा तब्बल सहाशे सतरा किमी चा प्रवास या युवकांनी सायकलवरुन केला . गावोगावी त्यांनी सालकल व व्यायामाचे महत्व पटवून दिले . सर्व विश्वस्त संस्था कार्यालयाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले . बुधवार दि १० रोजी उशीरा अष्टविनायक करुन हे सायकलस्वार पुन्हा मोरगाव येथे आले . या सर्वांचे स्वागत चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार यांनी शाल व श्रींची प्रतीमा देऊन तर शाल , श्रीफळ व हार देऊन मोरगावचे सरपंच निलेश केदारी व ग्रामसेवक मोरेश्वर गाडे यांनी केले .