भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष राजकारण करीत आला आहे.विरोधांकडून विकास तर होत नाहीच पण काँग्रेसने केलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्यात मात्र विरोधक पटाईत आहेत.मात्र तालुक्यातील सुज्ञ जनता ओळखून आहे विकास कोण करतंय.तालुक्याचा विकास हा काँग्रेसचौ माध्यमातून होत आला आहे आणि होणारही आहे.प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी कर्णावड ता.भोर येथे १ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन शनिवार दि-१३ करण्यात आले यावेळी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे,माजी जी.प.सदस्य गीतांजली आंबवले ,सामाजिक कार्यकर्ते आनंदराव आंबवले,अनिल सावले,बाजार समिती सभापती अंकुश खंडाळे,अर्जुन किंद्रे,संतोष केळकर,शिवाजी सासवडे,सरपंच तानाजी कुडपणे,गीतांजली शेटे,माजी सरपंच अशोक आंबवले,हनुमंत चव्हाण,काका कण्हेरकर,तानाजी राजीवडे ,चंद्रकांत मळेकर,अमित दरेकर,प्रमोद थोपटे आदींसह शेकडो चाळीसगाव खोऱ्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांनी विकास कामाचा बोर्ड टाकला खोडून
आमदार संग्राम थोपटे कोट्यवधी रुपयांची विकास कामे करीत आहेत.मात्र स्मशानभूमीचा निधी त्यांनी दिलेला नाही तरीही उदघाटन करीत असल्याने या रागापोटी कर्णावड ता.भोर येथील स्मशानभूमीच्या विकास कामाच्या बोर्ड खोडून टाकला.यामुळे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम परिसरात तणावाचे वातावरण होते.