सोमेश्वर रिपोर्टर टीम------
ज्युबिलेट कामगार युनियन निंबुत-निरा यांची दि१२/११/२०२१ रोजी कोणतीही बैठक मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये झालेली नाही. असे असताना देखील यशवंत भोसले व अनिल कोडे यांनी राज्यमंत्री (कामगार) यांच्या दालनात बैठक आयोजित होवून विविध विषयावर चर्चा झाल्याचे चुकीचे वृत्त सोशल मिडीयावर व वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाबतीत अशी कुठलीही बैठक व कसलीही चर्चा झाली नसल्याचे मंत्री महोदय यांच्या कार्यालयातून कळविण्यात आलेले आहेत.
त्यानुसार यशवत भोसले अनिल कोडे यावर मंत्री महोदयाचा अवमान केल्या प्रकरणी व कामगार वर्गात चुकीचा संदेश देवुन कामगारांची फसवणुक केले बाबत तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावा असे राज्यमंत्री (कामगार) महोदयानी निर्देश दिलेले आहेत व तशी व्रत ज्युबिलट कामगार युनियनचे अधिकृत अध्यक्ष सतिश काकडे यांना ही देण्यात आलेली आहे.
तरी संबंधीत व्यक्ती जर मंत्री महोदयाच्या बद्दल बाहेर चुकिचे बोलत असतील व चुकीच्या बातम्या प्रसारित करत असतील तर अशा प्रकारच्या व्यक्तींवर कारवाई होणे गरजेचे आहे तरी सर्व कामगारांनी व ग्रामस्थानी अशा व्यक्तीपासुन सावध राहणे गरजेचे आहे असे आवाहन ज्युबिलट कामगार युनियनचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे.