'सोमेश्वर रिपोर्टर'च्या बातमीचा इफेक्ट ! काळखैरेवाडी ते लोणी पाटी रस्त्याचे काम सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
गेली दोन वर्षे काळखैरैवाडी ते लोणीपाटी या राज्य महामार्गाची दुरवस्था झाली होती या रोडवर लहान मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले होते या रोडवरून जायचे म्हणलं तर जीव मुठीत धरून जावं लागत होते सतत पाठपुरावा करून पण बांधकाम विभाग दखल घेत नव्हते अखेर मागील चार दिवसांपूर्वी बाबूर्डी येथील राजकुमार लव्हे यांनी जर आता बांधकाम विभागाने या रोडचे काम तातडीने चालू नाही केले तर बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता यांची बातमी सोमेश्वर रिपोर्टर ने प्रसिध्द केली होती. 
              या बातमीची दखल घेत काल बांधकाम विभागाने तातडीने रोडचे काम चालू केले बांधकाम विभागाने तातडीने काम सूरू केल्यामूळे बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी बांधकाम विभागाचे नूकतेच नविन आलेले अभियंता श्री पवार यांचे आभार मानले.
To Top