सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सभासद हिताच्या अनेक विकास योजना राबविलेल्या आहेत. स्वच्छ, पारदर्शक व काटकसरीच्या कारभारामुळे सर्व सभासद बांधव संचालक मंडळावर समाधानी व आनंदी आहेत. निवडणुकीनंतर पुरंदर तालुका प्राथमिक सहकारी पतसंस्थेचा कर्जावरील व्याजदर लगेचच एक अंकी करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष नाना जोशी यांनी केले.
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. सासवड पंचवार्षिक निवडणूक शिक्षक महाविकास आघाडी पॅनेलच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी संत सोपानकाका यांच्या समाधीवर अभिषेक करून क-हाबाई मंदिर सासवड येथे सकाळी झाला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी व पतसंस्थेच्या सभासद बांधवांना मार्गदर्शन करताना नाना जोशी बोलत होते.
प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमाला शिक्षक पतसंस्थेचे सभासद बांधव बहुसंख्येने उपस्थित असल्याने याच दिवशी शिक्षक महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार बहुमताने निवडून येणार असून सत्ताधारी गटाची सत्ता कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यावेळी उपस्थित महिलांनी क-हाबाई मातेचे दर्शन घेतले.
यावेळी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समिती ,
पुरंदर तालुका केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक सभा, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै.शिवाजीराव पाटील), पुरंदर तालुका एकल शिक्षक सेवा मंच, पुरंदर तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटना, पुरंदर तालुका जुनी पेंशन हक्क संघटना, पुरंदर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी
पुरंदर तालुका एकल सेवा मंच महिला आघाडी,
पुरंदर तालुका केंद्रप्रमुख संघटना, सासवड नगरपालिका शिक्षक संघ,
पुरंदर तालुका शिक्षक भारती संघटना अशा संघटना पुरस्कृत महविकास आघाडी पॅनल आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संपर्कप्रमुख महादेव माळवदकर पाटील, पुणे जिल्हा शिक्षक समिती अध्यक्ष नंदकुमार होळकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे नेते श्यामकुमार मेमाणे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक एकल संघटनेचे विभागीय अध्यक्ष विकास उचाळे, जिल्हाध्यक्ष दादासाहेब खेसे ,राज्य मार्गदर्शक शरद मचाले ,पुणे जिल्हा शिक्षक पदवीधर सभेचे सरचिटणीस वसंतराव कामथे, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सभेचे अध्यक्ष श्रीधर वाघोले, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम, पुरंदर तालुका एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब खवले, दौंड तालुका अध्यक्ष संदीप थोरात, संघटक संदीप चव्हाण, पुणे जिल्हा एकल महिला शिक्षक संघटनेच्या नेत्या जयश्रीताई उबाळे, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती सतीश कुंजीर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची पतसंस्था चेअरमन मनोज दिक्षित आदींसह महाविकास आघाडी अंतर्गत सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी शिक्षक महाविकास आघाडीच्या वतीने अनु. जाती गटातून सुनील कांबळे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून अभिराज चव्हाण, इतर मागास वर्ग गटातून सुनिल जगताप, महिला राखीव गटातुन मधुबाला कोल्हे- भोंगळे, वनिता माळवदकर, सर्वसाधारण गटातून सुनील कुंजीर, अनिल चाचर, गणेश कामठे, रोहिदास कोलते, मनोज सटाले, सुरेश जगताप, गणेश लोणकर, संजय कुंजीर, बाळासाहेब सि. कुंजीर, सुनील नेवसे हे उमेदवार उपस्थिती होते.
यावेळी शिक्षक महाविकास आघाडी अंतर्गत शिक्षक संघटनांच्या प्रमुख मान्यवर नेत्यांनी मनोगते व्यक्त करून परिवर्तन पँनलने केलेल्या बिनबुडाच्या, खोटारड्या, कागदपत्रीय पुरावा नसलेल्या आरोपांचे खंडन करून वाभाडे काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव माळवदकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र जाधव व संदीप जगताप यांनी केले. आभार सुनील लोणकर यांनी मानले.