अवकाळीचा फेरा ! पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल .

Pune Reporter
3 minute read



-निवाऱ्यासाठी शाळा व मंदिरांचा घेतला आधार  


विशेष प्रतिनिधी -तुषार धुमाळ
सोमेश्वरनगर दि २

बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने सोमेश्वरनगर पंचक्रोशीमध्ये जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणी मजुरांच्या  निवासी स्थळावरील झोपड्यांमध्ये पाणी शिरले  .यामुळे उसतोडणी मजुरांना   रात्र जागून काढावी लागली यामध्ये ऊसतोडणी  मजूरांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या मध्ये पावसाचे पाणी शिरून धान्याची पोती ,संसारोपयोगी वस्तू,कपड्यांचे नुकसान झाले .अवकाळी पावसामुळे हवेत गारवा वाढला होता भरपावसात व गारठ्यात उभं राहून झोपडीत रात्र  काढण्याची वेळ ऊसतोडणी मजुरांवर आली.सकाळी सोमेश्वर कारखान्याचे प्रशासनाने तातडीने ऊसतोडणी मजुरांच्या निवासी स्थळावरील साचलेले पाणी हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले व घटनास्थळी  सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व संचालक ऋषिकेश गायकवाड  यांनी भेट दिली. धीर देत तात्काळ   ऊसतोडणी मजुरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था प्राथमिक शाळेमध्ये केली .


ओ साहेब आमची मीठ अन मिर्ची  सकट पाण्यात  इरगाळली !


साहेब लय पाऊस झाला आम्ही रातभर गुडघाभर पाण्यात कशी काढली काय तुमासनी सांगावं आमच्या झोपडी मधलं सगळं पाण्यात गेले आमचं धान्य अंथरूण पांघरूण कपडे संमदी पाण्यात भिजली  आमची मीठमिरची सकट इरगाळली आता या पाण्यात अन् गारठ्यात कुठं जायचं, काय पांघरायच आणि काय खायचं  


ऊसतोडणी मजूर - छाया क्षीरसागर ,बीड



२४ तासांत तब्बल ७३.८ मिलिमीटर पावसाची नोंद !


    सोमेश्वरनगर परिसरात बुधवारी चोवीस तासांमध्ये ७३.८ मिलिमीटर पाउसाची नोंद  आघारकर संशोधन संस्था  ,होळ -सोरटेवाडी येथे करण्यात आली  सन १९९३ मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये असा पाऊस झाला होता त्यानंतर तब्बल २८ वर्षांनंतर २०२१ मध्ये एवढ्या मोठ्या पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती अजित  चव्हाण परिक्षेत्र प्रभारी ,यांनी दिली  ते पुढे म्हणाले की मागील दोन तीन दिवसांमध्ये गहू अथवा हरभऱ्याची जी पेरणी झाली आहे त्या पेरणी वरती या  पावसाच्या   मोठ्या प्रमाणावरती परिणाम होणार आहे.शेतात पावसाचे पाणी साठले असल्याकारणाने  व हवेमध्ये शंभर टक्के आर्द्रता असल्याने  बीज अंकुरणार नाहीत ते सोडतील अथवा कुजतील तसेच गहू हरभऱ्याला थंडीचे हवामान पोषक असते .शेतामधील गहू या उभ्या  पिकाला फुटवे फुटणार नाहीत व हरभरा व गव्हावरती ढगाळ वातावरण मुळे किडीचा अथवा रोगाचा प्रादुर्भाव  होण्याच शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.


अजित चव्हाण ,परिक्षेत्र अधिकारी आघारकर संशोधन   संस्था होळ-सोेरटेवाडी
To Top