सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील चाळीसगाव खोऱ्यातील कारी,अंगसुळे व भावेखल ता.भोर येथे गेले चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोच्या साथीची रुग्णांना लागण झाली असून ३ गावातील रुग्ण खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेले चार दिवसांपासून या तीन गावात दूषित पाण्यामुळे उलट्या,जुलाब याची साथ मोठ्या प्रमाणावर सुरू असून तीन गावांतील २५ रुग्ण आजारी आहेत. त्यातील ६ खासगी दवाखान्यात तर २ जण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.सद्या आरोग्य यंत्रणेद्वारे पथक गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून प्राथमिक उपचार करत आहेत.तर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पाणी शुद्धीकरण करण्याचे काम सुरू आहे.असे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.कारी येथील शिव मागलेआवाड, सुतारआवाड, घोलपआवाड व चौका येथील सुमारे १८ जणांना तीन-चार दिवसांपासून उलट्या जुलाबाची मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे तर अंगसुळेतील ७ जणांना उलट्या जुलाबाची साथ सुरू असून भावेखल येथील २ जण आजारी आहेत.
COMMENTS