सोमेश्वर रिपोर्टर टीम------ भोर : प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंञी शिवसेना पक्षाचे आहेत.माञ शिवसेना पक्षात कार्यक्षम कार्यकर्त्यांवर वरिष्ठ पदाधिकारी अन्याय करत असल्याने सद्या भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम थांबवण्याचे शिवसेना नेते यांना पत्र दिले आहे. बडे नेते हुजरेगिरी करणारांवर मेहरबान होतात हे लक्षात आले असल्याने अनेक जण पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत असे सोमवार दि. २९ भोर शहरातील शिवसेना पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या पञकार परिषदेत भोर तालुका अधिकारी युवासेना केदार देशपांडे , तालुका प्रमुख युवराज जेधे ,शहर प्रमुख नितीन सोनावले यांनी माहिती दिली. तालुक्याच्या राजकरणात काँग्रेस ,राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असताना मुख्यमंञी हे शिवसेना पक्षाचा असल्यामुळे आम्हाला मोठा अभिमान आहे. परंतु विकास कामे , नागरिकांच्या समस्या असे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असताना शिवसेना पक्षाचे उपनेते , पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवींद्र मिर्लेकर , माजी संपर्क प्रमुख सत्यवान उभे , सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे हे कार्यकर्त्यांना विचारात न घेता भोर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची अवहेलना करून अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे कार्यकर्ते तुकाराम गोळे , रमेश तुपे , बाळू वाटकर , स्वप्निल शिनगारे , अशा १०० ते १५० कार्यकर्त्यांनी भोर तालुक्यातील शिवसेना पक्षाचे काम थांबवून पक्षाच्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत. का असेही सांगण्यात आले.
COMMENTS